chatrapati

छत्रपती शिवाजी महाराज हे सतराव्या शतकाच्या पूर्वार्धा त महाराष्ट्रामध्ये युगप्रवर्तक व्यक्ति मत्त्व उदयास आले. त्यांनी येथील अन्यायी राजसत्तांना आव्हान देऊन स्वराज्याची स्थापना केली. त्यांचा जन्म शके १५५१, फाल्गु न वद्य तृतीयेस म्हणजेच १९ फेब्रुवारी, १६३० रोजी पुणे जिल्ह्यातील  जुन्नरजवळील शिवनेरी किल्ल्यावर झाला.

शहाजीराजे:शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे हे दक्षिणेतील एक मातब्बर सरदार होते. मुघलांनी  निजामशाही जिंकून घेण्यासाठी मोहीम हाती घेतली. या मोहिमेत विजापूरच्या  आदिलशाहाने मुघलांशी सहकार्य केले. मुघलांचा दक्षिणेतील प्रवेश होऊ नये, ही शहाजीराजांची भावना होती. म्हणून त्यांनी मुघलांना प्रखर विरोध करून निजामशाही वाचवण्याचा प्रयत्न केला; परंतु मुघल व आदिलशाही यांच्या सामर्थ्या पुढे त्यांचा नि भाव लागला नाही. इ.स.१६३६ मध्ये निजामशाहीचा पाडाव होऊन ती नष्ट झाली. निजामशाहीचे अस्तित्व संपुष्टात आल्यानंतर शहाजीराजे विजापूरच्या आदिलशाहीचे सरदार झाले. शहाजीराजांकडील भीमा व नीरा या नद्यां मधील पुणे, सुपे, इंदापूर व चाकण हे परगणे हा त्यां च्या मूळ जहागिरीचा मुलूख आदिलशाहाने त्यां च्याकडेच ठेवला. आदिलशाहाकडून त्यां ना कर्ना टकात बंगळूरू व त्याच्या आसपासचा प्रदेश जहागीर म्हणून मिळाला.शहाजीराजे पराक्रमी, धैर्य शील, बुद्धिमान आणि श्रेष्ठ राजनीतिज्ञ होते. ते उत्तम धनुर्धर होते. तसेच, तलवार, पट्टा आणि भाला चालवण्यात पटाईत होते. प्रजेवर ते अतिशय प्रेम करत असत. महाराष्ट्र,कर्नाटक आणि तमिळनाडू येथील अनेक प्रदेश त्यांनी जिंकून घेतले होते.दक्षिण भारतात त्यांचा मोठा दरारा होता. शि वराय आणि जिजाबाई बंगळूरू येथे असताना त्यांनी शिवरायांना राजा बनण्यासाठी योग्य असे उत्तम शिक्षण देण्याची व्यवस्था केली होती. परकीय लोकांच्या सत्ता उलथवून स्वराज्य स्थापन करावे, ही त्यांची स्व तःची तीव्र आकांक्षा होती. म्हणूनच
त्यांना स्वराज्य संकल्पक म्हटले जाते. त्यांनी शिवराय आणि जिजाबाई यांना विश्वासू व कर्तबगार सहकाऱ्यांशी बंगळूरूहून पुण्याला पाठवले.

वीरमाता जिजाबाई : जिजाबाई बुलढाणा जिल्ह्यातील सिंधखेडराजा येथील मातब्बर सरदार लखुजीराजे जाधव यांच्या कन्या होत. त्यांना लहानपणीच विविध विद्यां बरोबर लष्करी शिक्षणही मिळाले होते. शहाजी महाराजांचे स्व राज्य स्थापन करण्याचे स्वप्न साकार व्हावे, म्हणून त्या त्यांना प्रोत्साहन देऊन साहाय्य करत असत. त्या कर्तबगार आणि द्रष्ट्या राजनीतिज्ञ होत्या. स्वराज्य स्थापना करण्याच्या कार्यात त्यांनी शिवरायांना सातत्याने मार्गदर्शन केले. प्रसंगी प्रजेचे प्रश् न सोडवण्यासाठी निवाडे देण्याचे कामही त्या करत असत. त्या शिवरायांना उत्तम शिक्षण देण्याच्या बाबतीत सदैव जागरूक होत्या. त्यांनी त्यांच्यावर शील, सत्यप्रियता, वाक्चातुर्य , दक्षता, धैर्य , निर्भयता, शस्त्रप्रयोग , विजयाकांक्षा , स्वराज्यस्वप्न इत्यादींचे संस्कार केले.

शिवरायांचे सहकारी : शिवाजी महाराजांनी स्वराज्यस्थापनेची सुरुवात मावळ भागात केली. मावळ म्हणजे सध्याच्या पुणे जिल्ह्याचा पश्‍चिम व नैॠत्य दिशांचा भाग होय. मावळचा प्रदेश डोंगराळ, दऱ्याखोऱ्यां चा व दुर्ग म. मावळच्या या भौगोलिक परिस्थितीचा उपयोग महाराजांनी स्वराज्यस्था पनेत मोठ्या कौशल्याने केला. त्यांनी लोकांच्या मनात विश्वासाची व आपलेपणाची भावना निर्मा ण केली. स्वराज्यस्थापनेच्या या कार्यात त्यांना चांगले सवंगडी व सहकारी मिळाले. येसाजी कंक, बाजी पासलकर,बापूजी मुद्गल, नऱ्हे कर देशपांडे बंधू, कावजी कोंढाळकर, जिवा महाला, तानाजी मालुसरे,कान्हो जी जेधे, बाजीप्रभू देशपांडे, दादाजी नरसप्रभू देशपांडे ही त्यां तील काही नावे होत. या सहकाऱ्यां च्या बळावर त्यां नी स्व राज्याच्या स्थापनेचे कार्य हाती घेतले.

राजमुद्रा : स्वराज्यस्था पनेमागील शिवाजी महाराजांचे ध्येय त्यांच्या राजमुद्रेवरून स्पष्ट होते. या राजमुद्रेवर पुढील संस्कृत ओळी कोरलेल्या आहेत.

 rajmudra

प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्वि श्ववंदिता ।।
शाहसूनोः शि वस्यैषा मुद्रा भद्राय राजते ।।

अर्थ : ‘‘शहाजीचा पुत्र शिवाजी याची (शुक्ल पक्षा तील) प्रतिपदेच्या चंद्रकाेरीप्रमाणे वाढत जाणारी आणि जिला सर्व विश्वाने वंदन केले आहे – अशी ही मुद्रा (प्रजेच्या) कल्याणासाठी अधि राज्य गाजवते (शोभून दिसते).’’
मुद्रेवरील या वचनाचा अर्थ अनेक दृष्टींनी महत्त्वाचा आहे. महाराजांनी या वचनातून वडिलांविषयाची कृतज्ञता, स्वराज्य अखंडपणे विस्तारत जाईल हा विश्‍वा स, मुद्रेला म्हणजे पर्यायाने स्वराज्याला सर्वांचा आदर प्राप्त होत असल्याचा अनुभव , प्रजेचे कल्याण करण्याची बांधीलकी आणि आपल्या भूमीवर स्वतंत्रपणे अधिराज्य करण्याची खात्री , इतक्या गोष्टी व्यक्त केल्या आहेत.

आणखी माहितीसाठी रेफेर करा पुस्तके खालीलप्रमाणे

 

 

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे