आपलं जिल्हा आपलं गावजरंडेश्वरमोहोळरस्त्यावर विस्तारीकरणा

महाराष्ट्रात केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनातून रस्ते चकाचक होत आहेत.

संपादक ओंकार किसन शिंदे

महाराष्ट्रात केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनातून रस्ते चकाचक होत आहेत.

ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे. कुरुल ते पंढरपूर या रस्त्याकडे सध्या कुणाचेच लक्ष्य नसल्याचे दिसत आहे. सुस्ते गावचे अॅड, नागटिळक व सुहास घोडके आपल्या रक्ताने मुख्यमंत्री साहेबांना पत्र लिहूनही सरकार दखल घेत नाही..कुरुल ते पंढरपूर अंतर 35 किलोमीटर कित्येक वर्षे बनतोय जीव घेणे. अनेक वर्षांपासून हा राज्य मार्ग जसाच्या तसा आहे. त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणे म्हणजे ‘जीवघेण्यासारखी अवस्था आहे.

सध्या पावसाचे दिवस सुरू आहेत. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. दरवर्षी एक विशिष्ठ ठेकेदार या रस्त्यावरील खड्डे बुजवतो. परंतु, महिन्याच्या आत येथील खड्डे आहे तसेच होतात. त्यामुळे या रस्त्याचे मजबूतीकरण होणे गरजेचे आहे. सध्या पावसाळा असल्यामुळे या रस्त्यावर इतके पाणी साठत आहे की..वाडीवस्ती वरील रस्ते बरे पण कुरुल ते पंढरपूर रस्ता नको. वाहनचालकांना रस्ता आहे की ओढा-नाला हे समजत नाही. त्यामुळे प्रवास करणाऱ्या वाहनचालक व या मार्गावरील नागरिकांमधून मोठा संताप व्यक्त केला जात आहे. परंतु याविषयी स्थानिक नेतेमंडळी काहीही बोलत नाहीत. हे एक वास्तव आहे. शिवाय या मार्गावरून वारीच्या वेळेस अनेक पालख्या येतात, परंतु अद्यापही याविषयी काही प्रकिया झाल्याचे दिसत नाही. अख्या महाराष्ट्रात रस्त्याची कामे सुरू आहेत. कुरुल ते पंढरपूर हा रस्ता ही डांबरीकरण करून मजबूत करावा,.पंढरपूर ते कुरुलपर्यंत रस्ता जीवघेणा झाला आहे. अनेक छोटी-मोठी गावे, साखर कारखाना या मार्गावर आहे. परंतु वाहनचालकांना या मार्गावरून जाताना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे शासनाने याकडे लक्ष देऊन पंढरपूर -कुरुल मार्ग रस्त्याचा डांबरीकरण काम चालू करावे अन्यथा माळी सेवा संघ महाराष्ट्र राज्य संघटना व प्रहारच्या माध्यमातून रस्त्यावर झाडे लावुन आंदोलन केले जाईल इशारा माळी सेवा संघ सोलापूर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख व प्रहार जनशक्ती पक्ष मोहोळ तालुका उपप्रमुख नानासाहेब ननवरे व मोहोळ तालुका प्रमुख आबासाहेब गुरव, शेतकरी संघटना मोहोळ तालुका अध्यक्ष वैभव जावळे यांनी दिला..

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे