आपलं जिल्हा आपलं गावकेळघरताज्या बातम्या

सातारा जिल्हा बेलदार भटका समाज संघटेनेच्या जिल्हाध्यक्ष पदी दुर्योधन चव्हाण तर युवा जिल्हाध्यक्षपदी राजेंद्र जाधव यांची निवड .

प्रतिनिधी केळघर

सातारा जिल्हा बेलदार भटका समाज संघटेनेच्या जिल्हाध्यक्ष पदी दुर्योधन चव्हाण तर युवा जिल्हाध्यक्षपदी राजेंद्र जाधव यांची निवड .

  महाराष्ट्र राज्य बेलदार भटका समाज संघटनेची जिल्हास्तरीय बैठक सुरुर ता .वाई येथे कोरोनाचे सर्व नियम पाळुन बेलदार भटका समाज संघटनेचे मार्गदर्शक व राज्य कार्यकारणी सदस्य श्री अंकुश आनंदराव पवार यांचे अध्यक्षतेखाली व प्रदेश प्रवक्ते, प्रसिद्धी प्रमुख श्री नारायण जाधव (भाऊ), राज्य उपाध्यक्ष श्री विकास देवबा पवार यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली .

राज्य अध्यक्ष राजु साळुंके , सरचिटणीस विलासभाई चव्हाण , सहसचिव प्रा . संजिवकुमार जाधव यांचे सुचनेनुसार ही बैठक आयोजीत करण्यात आली होती .

   यावेळी झालेल्या बैठकीत हंगामी सातारा जिल्हा अध्यक्षपदी श्री दुर्योधन नारायण चव्हाण तर युवा जिल्हाध्यक्ष म्हणून राजेंद्र सर्जेराव जाधव यांची व सातारा जिल्हा युवा कार्याध्यक्ष पदी सुनिल आप्पा मोहिते यांची सर्वानुमते निवड करण्यात आली .

  यावेळी संपूर्ण सातारा जिल्ह्यातील सर्व तालुकानिहाय निवडी करून संपूर्ण सातारा जिल्हाची कार्यकारणी लवकरच जाहीर करण्याचे ठरले त्याप्रमाणे वाई तालुका बेलदार भटका समाज संघटनेच्या अध्यक्षपदी श्री सुरेश श्रीरंग मोहिते , वाई तालुका युवा अध्यक्षपदी सागर श्रीरंग जाधव तर जावली तालुका अध्यक्ष पदी ज्ञानदेव जगन्नाथ जाधव यांची तर जावली तालुका उपाध्यक्ष म्हणून सतिष पांडुरंग चव्हाण यांची सर्वानुमते निवड करण्यात आली .

  यावेळी विलास जंगलु पवार , रमेश नामदेव मोहिते , अनिल साहेबराव चव्हाण , विश्वास श्रीरंग मोहिते , किशोर दशरथ चव्हाण, अशोक बाबाजी मोहिते , प्रकाश श्रीरंग मोहिते , शुभम दुर्योधन चव्हाण, राजेंद्र दादाराम मोहिते यांची उपस्थिती होती .

 नवनिर्वाचीत सर्व पदाधिकाऱ्यांचे राज्य अध्यक्ष श्री राजु साळुंके , राज्य सरचिटणीस विलासभाई चव्हाण , सहसचिव प्रा संजिवकुमार जाधव , राज्य युवाअध्यक्ष नवथाथ मोहिते यांचेसह सर्व स्थरातुन अभिनंदन होत आहे .

फोटो : महाराष्ट्र बेलदार भटका समाज संघटनेच्या जिल्हा अध्यक्ष व सर्व नवनुयुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देताना श्री अंकुश पवार, विकास पवार, नारायण जाधव आदी .

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे