आपला साताराताज्या बातम्याशाळा

तर इंग्रजी माध्यमाच्या शाळा चालवायच्या कशा?; खासदार उदयनराजेंचा सरकारला सवाल

प्रतिनिधी यश शेटे

.तर इंग्रजी माध्यमाच्या शाळा चालवायच्या कशा?; खासदार उदयनराजेंचा सरकारला सवाल.

सातारा : आरटीईची (RTE) देय असलेली प्रलंबित थकित रक्कम महाराष्ट्रातील इंग्रजी शाळांना (English Medium School) देण्यास सरकार दिरंगाई का करत आहे. तीन वर्षांची रक्कम प्रलंबित असेल, तर संस्था चालकांनी शाळा चालवून, मुलांना दर्जेदार शिक्षण कसे द्यायचे?, असा सवाल खासदार उदयनराजे भोसले (MP Udayanraje Bhosale) यांनी उपस्थित केला आहे. (MP Udayanraje Bhosale Questioned To Government How Will Do Continue English Medium School Satara Marathi News) आहेत

खासदार उदयनराजे पुढे म्हणाले, राईट टू एज्युकेशन (Right to Education) हा मुलभूत अधिकार आहे. त्या अंतर्गत इंग्रजी माध्यमांच्या शाळेत एससी एसटी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील २५ टक्के प्रवेश राज्य शासनाने राखीव ठेवला आहे. त्या २५ टक्के मुलांची वार्षिक शैक्षणिक फी शासनाने देण्याचे धोरण स्वीकारले आहे. सन २०१८-१९ पर्यंत सदरची रक्कम इंग्रजी शाळा चालकांना मिळाली. गेल्या तीन वर्षांपासून सदरची आरटीई रक्कम इंग्रजी शाळांना शासनाने प्रदान केलेली नाही. महत्वाच्या शिक्षण क्षेत्रातील ही बाब शैक्षणिक शोकांतिका म्हणावी लागेल. एकीकडे आपल्या मुलांना चांगले शिक्षण मिळण्यासाठी पालकांची घडपड आणि २५ टक्के राखीव जागांची फी शाळांना वितरीत करण्याकामी शासनाची ही उदासीनता, खासगी शिक्षण क्षेत्राला (Private Education) मुरड घालणारी आहे

 

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे