ब्रेकिंगरस्त्यावर विस्तारीकरणावाई

खंबाटकी बोगदा उत्खननासाठी 32 कोटी भरा; तहसीलदारांचे ‘गायत्री प्रोजेक्ट’ला आदेश

संपादक-ओंकार किसन शिंदे

खंबाटकी बोगदा उत्खननासाठी 32 कोटी भरा; तहसीलदारांचे ‘गायत्री प्रोजेक्ट’ला आदेश..

वाई (सातारा) : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर (Pune-Bangalore National Highway) खंबाटकी बोगदा (Khambatki tunnel) विस्तारीकरणाच्या उत्खननासाठी गायत्री क्रसेंट प्रोजेक्ट या ठेकेदार कंपनीस ५ लाख १५ हजार ९१५ ब्रास गौण खनिज उत्खननापोटी स्वामित्व धन व दंडात्मक रक्कम मिळून एकूण ३२ कोटी ८९ लाख ८८ हजार रुपये रक्कम भरण्याचे आदेश वाईचे तहसीलदार रणजित भोसले (Tehsildar Ranjit Bhosale) यांनी दिले आहेत. (Tehsildar Ranjit Bhosale Orders Payment Of 32 Crore For Excavation Of Khambatki tunnel Satara Marathi News)..

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील पुणे सातारा रस्त्यावर विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. त्याअंतर्गत खंबाटकी घाटात बोगद्याचे काम सुरू आहे. यासाठी गायत्री क्रसेंट प्रोजेक्ट या कंपनीस ठेकेदार म्हणून नेमण्यात आले आहे. या कंपनीने आतापर्यंत या ठिकाणी केलेल्या गौण खनिज प्रकरणी स्वामित्वधन व दंडात्मक रक्कम भरण्याची नोटीस संबंधित ठेकेदारास तहसीलदार भोसले व सातारा जिल्हा प्रशासनाने वेळोवेळी बजावली होती. या नोटिसाविरोधात संबंधित कंपनीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेऊन नोटीस रद्द करण्याची मागणी न्यायालयाकडे केली होती. हे सरकारी काम असून, या ज्या गटातून हे उत्खनन केले जात आहे त्याच गटात हे वापरले जाणार आहे. त्यामुळे शासनाचे गौण खनिज स्वामित्वधन व दंडाची रक्कम आम्हाला लागू होत नाही.

त्यामुळे न्यायालयाने या नोटिसा रद्द कराव्यात व स्वामित्वधन दंडाची रक्कम माफ करावी, अशी मागणी ठेकेदाराने न्यायालयाकडे केली होती. सुनावणी दरम्यान हे आदेश नसून नोटीस आहेत. त्यासाठी तहसीलदार वाई यांच्याशी संपर्क साधून संबंधित कंपनीने आपले म्हणणे त्यांच्याकडे सादर करावे, तसेच तहसीलदारांनी त्यांचे म्हणणे एकूण घेऊन योग्य ते आदेश पारित करावेत, असे निर्देश उच्च न्यायालयाने तहसीलदार भोसले यांना दिले होते. याप्रमाणे मे २०२१ मध्ये तहसीलदार वाई यांच्यासमोर सुनावणी झाली. संबंधित कंपनीचे म्हणणे ऐकून घेतल्यावर शासनाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे गौण खनिज उत्खननाचे स्वामित्वधन व दंडापोटी संबंधित कंपनी ३२ कोटी ८९ लाख ८८ हजार रुपये भरण्याचे आदेश तहसीलदार भोसले यांनी ठेकेदार कंपनीस दिले आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे