Covid-19Lockdownआपला जिल्हामहाराष्ट्र

८० वर्षाच्या आज्जीने केली कोरोनावर मात ,ठणठणीत होऊन परतली घरी

उपसंपादक: राहुल कर्पे

८० वर्षाच्या आज्जीने केली कोरोनावर मात ,ठणठणीत होऊन परतली घरी 

 

पिंपोडे बुद्रुक/ प्रतिनिधी ,

अभिजीत लेंभे

कोरेगाव :- कोरेगाव तालुक्यातील न्हावी बु ।। ( जयपूर ) येथील ८० वर्षाच्या आज्जी श्रीमती सुलोचना निकम यांनी कोरोनावर मात करून ठणठणीत पूर्ण बऱ्या होऊन घरी परतल्या आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि न्हावी बु।। ( जयपूर ) येथील वयोवृद्ध महिला कोरोना पाँझिटिव्ह असून आँक्सिजन बेडची तातडीने कोरेगाव येथे सोय होईल का असा फोन कोकराळे ,ता.खटाव येथून सागर पवार यांनी पत्रकार संदीप पवार यांना केला.

पत्रकार संदीप पवार यांनी निकय यांच्या नातेवाईकांना सांगितले की पेशंटला घेऊन कोरेगाव येथील श्री.काडसिध्देश्वर कोविड हाँस्पिटलमध्ये या. तोपर्यंत कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांचे सहकारी यांच्या बरोबर पेशंट अँडमिट करण्यासाठी बोलणे झाले होते. वयोवृद्ध महिला पेशंटची अवस्था अतिशय गंभीर होती. डॉ. अरूणाताई बर्गे यांनी पेशंटला बघितले .पेशंटची परिस्थिती लक्षात घेता त्यांनी सांगितले की पेशंटला जम्बो कोविड हाँस्पिटलमध्ये घेऊन जावा.

कारण पेशंटची अवस्था फारच बिकट होती.आँक्सिजन लेवल कमी ,जुलाब सुरू ,अशक्तपणा ,स्कोर पण कमी .पण पत्रकार संदीप पवार यांनी डॉ. अरूणाताई बर्गे या सांगितले की काहिही झाले तरी चालेल पण पेशंट आपल्या येथेच दाखल करून घ्या. विनंती मान्य करून पेशंटला श्री.काडसिध्देश्वर हाँस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.हळूहळू पेशंटला उपचार सुरू झाले. उपचार सुरू होताच श्रीमती सुलोचना निकम यांच्या तब्बेतीत सुधारणा होऊ लागली. बघता बघता दहा दिवस अतिशय चांगले उपचार करण्यात आले.

बुधवार दि.९ रोजी या ८० वर्षाच्या आज्जी पूर्ण बऱ्या झाल्या असल्याने त्यांना हाँस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला.

अविनाश निकम ( नातू ) याची प्रतिक्रिया – माझ्या आज्जीचा स्कोर १७ होता.आँक्सिजन लेवल कमी होती. पेशंटची अवस्था अतिशय गंभीर होती.मला कुठेही बेड मिळत नव्हता.

जवळजवळ आम्ही आमच्या आज्जीची आशाच सोडून दिली होती. परंतु कोरेगावचे आमदार महेश शिंदे व डॉ. अरूणाताई बर्गे तसेच त्यांचे सर्व सहकारी यांच्यामुळेच माझ्या आज्जीला जीवदान मिळाले आहे. महेश शिंदे हे आमदार तर आहेतच पण ते एक देवमाणूस सुध्दा आहेत.

तसेच पत्रकार संदीप पवार यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले त्याबद्दल त्यांचेही मी आभार मानतो. आज या सर्व मंडळींच्या मुळेच माझी आज्जी सुखरूप चरी पोहचली.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे