इंदापूरब्रेकिंगराजकीय

इंदापूरच्या ‘मामा’ चं सोलापूरात करायचं काय ? बारामतीकर काकांच्या कोर्टात चेंडू !

संपादक-ओंकार किसन शिंदे

इंदापूरच्या ‘मामा’ चं सोलापूरात करायचं काय ? बारामतीकर काकांच्या कोर्टात चेंडू ! पालकमंत्री बदलाची मुंबईत ‘सिल्वर ओक’ मध्ये बंद दाराआड झडली चर्चा..भरणे मामांच्या उचलबांगडीसाठी राष्ट्रवादीच्या हायकमांडकडे तक्रारी, मंगळवारी पुण्यात अंतीम फैसला…मामांविरूध्दच्या तक्रारींची राष्ट्रवादीच्या पितामहांकडून दखल, मंगळवारी मामा पुन्हा येणार हायकमांडशरद पवारांच्या हिटलिस्टवर… राष्ट्रवादीच्या पालकमंत्री पदाच्या खांदेपालटाचा पुन्हा येऊ शकतो जिल्ह्याला अनुभव..

नामदार दत्तात्रय भरणे यांच्या पालकमंत्री पदावरील उचलबांगडी संदर्भातला निर्णय लवकर होण्याची चिन्हे आता स्पष्टपणे दिसू लागली आहेत. राष्ट्रवादीचे हायकमांड शरद पवार यांच्यापुढे काल मुंबईत भरणे मामा यांच्या आक्षेपार्ह कारभाराचा पाढा वाचला गेला. भरणे मामा हे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावर राहिल्यानं काय नुकसान झालं आणि पुढे काय नुकसान होणार ? हे सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांकडून ऐकून घेतल्यानंतर, पवारांनी येत्या मंगळवारी दि. 15 जूनला पुण्यात अंतीम फैसला करू असं सांगितलं.

भरणे मामा यांच्या पालकमंत्रिपदाच्या खांदेपालटाविषयी पुण्यात शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी तसेच लोकप्रतिनिधी आपली भूमिका मांडणार आहेत. याच बैठकीत भरणे मामा यांच्याकडील पालकमंत्री पद काढून घेण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब होऊ शकतं.

भरणे मामा यांच्याकडील पालकमंत्री पद काढून घेतल्यास, राष्ट्रवादीच्या पालकमंत्रीपदाच्या खांदेपालटाचा सोलापूर जिल्ह्याला पुन्हा अनुभव येऊ शकतो. मंत्रिपदावर चौथा चेहरा येऊ शकतो. शरद पवार यांच्याकडील बैठकीला ज्येष्ठ नेते बळीरामकाका साठे, माजी आमदार राजन पाटील, मोहोळचे आमदार यशवंत माने आदीजण उपस्थित होते.

दत्तात्रय भरणे यांना पालकमंत्री पदावरून पायउतार करण्यासंदर्भात राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चाचपणी व खलबतं सुरु असल्याची सर्वात पहिली बातमी ‘शिवगर्जना न्यूज मराठी’ ने दिली होती.

——-

ठळक नोंद

———

पालकमंत्री भरणेमामा यांच्या या तक्रारींचा पाढा वाचला गेला शरद पवारांकडे…

* इंदापूर तालुक्यातील 22 गावांना उजनीचे पाणी नेण्यावरून जिल्ह्यात सत्ताधारी आघाडी सरकार पर्यायानं राष्ट्रवादीच्या विरोधातील अद्यापही तापलेलं वातावरण, राष्ट्रवादीच्या स्वार्थी आणि अप्पलपोटीपणार आलेले प्रश्नचिन्ह

* पालकमंत्री यांनी उजनीतून पाणी नेण्याचा मांडलेला अट्टाहास

* कोरोना महामारीत स्वतःच्या इंदापूर तालुकावर कमांडर ठेवताना, पालकमंत्री असुनही सोलापूर जिल्ह्याकडे फिरवलेली पाठ

* सोलापूर जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा स्वतःच्या मतदारसंघात राबवून कोरोना लसींची केलेली पळवापळवी

* खुद्द राष्ट्रवादी तसेच काँग्रेस, शिवसेना या पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना तसेच लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता मनमानी पद्धतीने चालू ठेवलेला कारभार

* प्रशासनात स्वतःच्या मर्जीतले अधिकारी आणून बसवत दुकानदारीला प्रोत्साहान देण्याची घेतलेली भूमिका

* पालकमंञीपदासारख्या महत्त्वाच्या जबाबदार पदावर राहताना, केवळ औपचारिकता म्हणून केला जात असलेला कारभार

* सर्वात महत्वाचे म्हणजे स्वत:च्या धनगर समाजाच्या व्यक्तींना प्रत्येक वेळी जवळ धरण्याबरोबरच न्याय देण्याचं धोरण

* राष्ट्रवादीमधील मराठा समाजाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांना दिली गेलेली दूय्यम दर्जाची वागणूक आणि अनेकवेळा बेदखल करण्याचे वर्तन

* पालकमंत्री पदाचा जिल्ह्याच्या राष्ट्रवादीसाठी होत नसलेला उपयोग, त्याशिवाय सरकार मधील घटक पक्ष काँग्रेस आणि शिवसेना यांचाही कायमचा रोष

* पालकमंत्री पदावर प्रभावी काम करण्याची भरणे मामांची मुळातच नसलेली मानसिकता

* प्रशासनावर न ठेवता आलेली कमांड

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे